Share

“कोण कसा डाव खेळतं हे डावाच्या…”, सोमय्यांच्या ‘त्या’ आरोपानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: दापोली मुरूड येथील साई रिसॉर्ट परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत या जमिनीचे मूळ मालक विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ शकतो, असे म्हणत यांची माहिती त्यांनी थेट पत्राद्वारे राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिली आहे. यावरच अनिल परब यांनी आज एसटी वर्धापनदिनी कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली आहे.

“मी किरीट सोमय्या यांना उत्तर द्यायला बांधील नाही. जे अधिकारी आम्हाला प्रश्न विचारतात त्यांची उत्तरे आम्ही देत आहोत. परंतु ही सगळी नौटंकी गेले वर्षभर चालु आहे.  आरोप असतील तर त्यांनी ते यंत्रणेकडे करावे. यंत्रणेने आमची चौकशी करावी, त्यातून सत्य बाहेर येईल. बुध्दिबळ आहे, कोण कसा डाव खेळतं हे डावाच्या अंती कळते. त्यामुळे यावर आता बोलणे योग्य नाही.”, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

दरम्यान एसटी वर्धापन दिनाचा मुहुर्त साधत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ नावाने सोडलेली आहे. या महिन्या अखेरीस १५० बसेस पहिल्या टप्प्यात सरकारी योजनेतुन येतील. अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!