शिवसेनेतील बंडखोरीचा शुक्रवार चौथा दिवस होता. गुरुवारी पक्षाने बंडखोरांना २४ तासांत मुंबईत परतण्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र बंडखोर आमदार मुंबईत परतले नाहीत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना बंडखोर आमदारांना विसरून शिवसेनेची नव्याने बांधणी करण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घरी मातोश्रीवरून दिवसभर बैठका घेतल्या. शरद पवारही आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह मातोश्रीवर पोहोचले होते. आगामी रणनीती ठरविण्यासाठी पवार आणि ठाकरे यांच्यात तब्बल दोन तास बैठक झाली. काल शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना आक्रमक झाली. संजय राऊत देखील बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. त्यामुळे राज्यात गढूळ राजकारण पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात तीन नेते महत्वाची भूमिका बजावत आहेत. यामध्ये बंडखोर नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. या तिघांची भूमिका राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा देणार आहे. पण या सर्वांमध्ये शिवसेनेचे मोठे खच्चीकरण होणार असल्याची चर्चा आहे. कारण काही झाल तरी शरद पवार कल्पना देतील, त्या स्वार्थी देखील असू शकतात. त्यामुळे जर शिंदे गट त्यांच्या भूमिकेवर ठाम राहीला तर याचा जोरदार फटका शिवसेनेला बसेल. उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाला बसेल. तो कसा हे समजून घेऊया.
शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत आक्रमक पवित्रा घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. त्यानंतर संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीचे विधान मागे घेत जमीनीवरील लढाई लढण्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरेंनी देखील पहिल्या लाईव्हनंतर आपली भूमिका बदलली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्यासोबत केलेल्या चर्चेत नवीन शिवसेना निर्माण करण्याचे आवाहन केले. तसेच ज्यांना जायचे त्यांनी जावे, असे देखील ठाकरे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही कठोर भूमिका त्यांच्या पायावर कुऱ्हाड मारणारी ठरेल. शिंदे गट ठाम राहिला तर राष्ट्रवादी नक्कीच दुसरा मार्ग स्विकारेल. हे आपण पहाटेच्या शपथविधी दरम्यान पाहीले. यामुळे अनिल देशमुख, नवाब मलिक यांना देखील दिलासा मिळेल. अन्य नेत्यांना देखील दिलासा मिळेल. अजित पवारांच्या मनासारखे होईल. यामुळे एकटी पडेल ती शिवसेना. याचा फटका शिवसेनेला २०२४ मध्ये देखील बसेल. एकंदरीत शिवसेना महाराष्ट्रात नावापुरती राहील.
आता जर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचे जास्त न ऐकता जरा नरम भुमिका घेतली. तर शिवसेना वाचू शकते. आज बाळासाहेब असते तर ते थेट दंड थोपटून आसामला गेले असते आणि त्यांनी बंडखोर आमदांरांचे ऐकून मोठे शक्तिप्रदर्शन केले असते. कारण शेवटी आपले घर महत्वाचे, घर फुटत असले सत्ता महत्वाची नाही. मात्र उद्धव ठाकरे स्वत:च्या घरातील भांडण सोडून शेजाऱ्यांचे ऐकून (शरद पवार) घरातीलचं सदस्यांच्या विरोधात उभे राहत आहेत. हे शिवसेनेला जड जाईल. शरद पवारांच्या मनात काय चालते, हे देवाला सुद्धा माहित नसते. कारण 1978 साली शरद पवार यांनी वसंतदादा पाटलांच्या सरकारमधून बाहेर पडत पुलोदचं सरकार स्थापन केलं होतं. शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका राजकारणात होत असते. स्वत: शिवसेनेचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी देखील “राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच,” असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी राजकराण क्रिकेटसारखे असते शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ चालतो. मॅच फिक्स असेल तर मैदानात बसलेले (शरद पवार) विनर ठरतात.
उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या मनानुसार नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या भुमिकेनुसार निर्णय घेणे गरजेचे आहे. मात्र त्यांना सत्तेची हाव लागल्याचे दिसते कारण शिंदे गट भाजपात सामील झाला तर त्यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही, हे त्यांना चांगले ठावूक आहे. त्यामुळे कदाचीत उद्धव ठाकरे आमदारांचे ऐकत नसतील. जर दोन आमदार नाराज असतील तर आपण समजू शकतो. तेव्हा पक्षनेतृत्वाला दोष देण्याची गरज देखील नाही. पण जर पक्षातील ३७ पेक्षा जास्त आमदार नाराज असतील तर उद्धव ठाकरेंना दोष का देऊ नये?, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना स्वत: हा विचार करणे गरजेचे आहे. पक्षातील ऐवढे आमदार नाराज असतील आणि आजही ते स्वत:ला शिवसैनिक म्हणत असलतील तर उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलने गरजेचे आहे. नाहीतर यामुळे भविष्यात देखील शिवसेनेला फटका बसले. पुन्हा शिवसेना निर्माण करण्याची घोषणा करणे म्हणजे मुर्खपणा आहे. शिवसेनेच्या मागे बाळासाहेबांचे कष्ट आणि मेहनत आहे. ज्याला उद्धव ठाकरे विसरत आहेत.
आज बाळासाहेबांची भूमिका काय असती?
या सर्व राजकीय गदारोळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांची काय भूमिका असती, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. आता बाळासाहेब असते तर त्यांनी नक्कीच शिवसैनिकांची बाजू घेतली असती. मुळात हा प्रश्न उद्भवला नसता. हे सर्व होतयं ते राष्ट्रवादी काँग्रेसमुळे. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी राष्ट्रवादीला विरोध केला होता. त्यांनी कधीच राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला नसता. बाळासाहेबांना शेवटपर्यंत शरद पवार यांचे विचार पटले नाहीत. त्यांची मैत्री होती मात्र विचारात कधी साम्यता नव्हती. बाळासाहेबांनी नेहमी हिंदुत्वाचा प्रचार व प्रसार केला. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला बाळासाहेबांनी मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी आपण कधीही राष्ट्रवादी सोबत जाणार नसल्याचे म्हटले होते. तसेच राष्ट्रवादीचा त्यांनी निंदक, असा उल्लेख केला होता.
राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना
राष्ट्रवादीचे कार्येकर्ते देखील शिवसेनेला नेहमी डिवचतात. महाविकास आघाडी निर्माण होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेवर खोचक टीका करत होते. उध्दव ठाकरे देखील शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर टीका करत होते. त्यामुळे इतिहासचे पान विसरून चालणार नाही. राष्ट्रवादीने तर आदित्य ठाकरेंना पेंग्विन युवराज, असे टोपण नाव दिले होते. यात सक्षणा सलघर आघाडीवर होत्या. त्यांनी थेट शरद पवार यांच्यासमोर आदित्य ठाकरे यांना बेन म्हटले होते. त्यामुळे आज जरी शरद पवार उद्धव ठाकरेंना पाठींबा देत असले. तरी शिवसेना संपली तर राष्ट्रवादीला फरक पडणार नाही. फरक पडणार तो फक्त शिवसेनेला. भुमिका बदलली म्हणजे नाते टीकते, असे नाही विचार जुळले पाहीजेत. त्यामुळे राष्ट्रवादीची आधीची भूमिका तपासली पाहीजे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

