Share

Dilip Walse Patil : “आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत” – दिलीप वळसे पाटीलांचे स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई : विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अनेक शिवसेना नेत्यांनी सेनेशी बंड पुकारत आसामला मुक्काम ठोकला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी “आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे, याची जबादारी सरकारची असते”, असा गंभीर आरोप केला आहे, शिंदेंच्या या आरोपावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

“राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत”, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत काय म्हणाले?

बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आल्यावरून एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, “ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यांनी ढुंगणाला पाय लावून राज्यातून पलायन केले आहे. त्यांना आमदार म्हणून सुरक्षा आहे. आमदारांना सुरक्षा असते कुटुंबियांना नाही.  महाराष्ट्रात या, आपल्या राज्यात या. असे वणवण का फिरताय?,भिकाऱ्यासारखे फिरू नका. तुम्ही वाघ आहात बकरीसारखे का म्या म्या करत आहात?”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!