मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला पाठिंबा दिला तर काहींनी त्याला विरोध केला. आता नुकतीच याबाबत शरद पोंक्षेनी (Sharad Ponkshe) एक पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. सध्या ही पोस्ट खूप चर्चेत आहे.
पोंक्षेंनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले की, “कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय, दुसरं वादळ एका लढवय्या अभिनेत्याने कॅन्सरवर केलेली मात! एका झुंजीची गाथा! – शरद पोंक्षे, दोन महिन्यात दुसरी आवृत्ती!
https://www.instagram.com/p/CfMDIDdOiCE/
त्याचबरोबर या पोस्टमध्ये शरद पोंक्षे यांच ‘दुसरं वादळ’ हे पुस्तक दिसतं आहे. शरद पोंक्षें यांच्यासोबत एकनाथ शिंदे दिसत आहेत. या पोस्टमध्ये “हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत: ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं…सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले,” असे लिहिले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


