🕒 1 min read
सिंधुदुर्ग: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जातीयवादावरून बरीच टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. आता शिवसेनेचे कोकणातील खासदार विनायक राऊत यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष भाड्यावर ठेवलेला पक्ष असून जेव्हा कोणाला त्याची गरज भासते तेव्हा तो भाड्याने दिला जातो, नकला करून पक्ष चालत नसतो. असे किती आले आणि गेले, अशा शब्दात मनसेवर खासदार राऊत यांनी खोचक टीका केली आहे.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही. कालची सभा आम्ही ऐकली पण नाही आणि पाहिलीही नाही. असे किती आले आणि किती गेले, शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सरकार भक्कम राहील, या सरकारला कुणाचाही धोका नाही. नकला करून पक्ष चालत नसतो, त्यासाठी मेहनत करावी लागते. आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मेहनतीने महाराष्ट्राचा कारभार पाहत आहेत. ती मेहनत अशा नकलाकारांना जमणार नाही. नकला ठीक आहे, करमणूक होतेय”.
“शिवसेनेला कोणीही कमी लेखू नये, यापूर्वीसुद्धा बऱ्याच जणांचा जन्म झाला आणि अस्तही झाला. मात्र, शिवसेना त्यापेक्षाही अधिक गतीने चालत आहे. त्यामुळे शिवसेना संपवण्याची सुपारी कोणी घेत असेल तर ते सांगतील, मात्र शिवसेना जबरदस्त ताकतीनिशी उभी राहील”, असेही विनायक राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

