Share

Russia vs Ukraine war: ऑपरेशन गंगा वरून छगन भुजबळ यांचा नरेंद्र मोदी यांना टोला ; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO मध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्र अवलंबविला आहे. या दोन देशांमधील युद्धामुळे जगातील प्रत्येकच देशाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष  रित्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

भारत देश पण याला अपवाद नाही. भारतातून दर वर्षी हजारो युवक आणि युवती वैद्यकीय शिक्षण घ्यायला युक्रेनला जातात. परंतु युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ”OPRATION GANGA” (ऑपरेशन गंगा) हा उपक्रम सुरु केला आहे. नुकतेच ऑपरेशन गंगा अंतर्गत केंद्रीय मंत्रिमंडळातील ४ मंत्री युक्रेन शेजारील देशात गेले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तिथून भारतात परत आणण्यास मदत व्हावी म्हणून भारत सरकारचे ४ मंत्री युरोप दौऱ्यावर गेले आहेत. भारत सरकारमधील ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीप सिंग पुरी, जनरल. वी.के सिंग आणि किरण रिजिजू हे चार मंत्री युरोप दौऱ्यावर गेले आहेत.

मात्र या मंत्र्यांच्या दौऱ्यावरून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना छगन भुजबळ म्हणाले कि, ” रशिया आणि युक्रेनमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले आहे. त्यानंतर आता युक्रेनच्या शेजारील देशात  भारत सरकारमधील चार मंत्री पाठवून मोदी सरकार इव्हेंट करत आहे. खरे तर सर्व भारतीय मुलांना यापूर्वीच वाचवायला हवे होते, अशी जोरदार टीका मंगळवारी महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्र सरकावर केली आहे. मोदी सरकारने युक्रेनमधून भारतीयांना परत आण्यासाठी प्रचंड उशीर केला असून ; अमेरिकेने युद्धाचे ढग दाटत असतानाच आपल्या नागरिकांना परत बोलावून घेतले आहे. आता भारत सरकारला उशीर झाला असून सरकारमधील चार मंत्री पाठवून मोदी सरकार इव्हेंट तयार करत आहे. तसेही छोट्या गोष्टींचा इव्हेंट तयार करून मत मिळवायची हे नरेंद्र मोदी यांना चांगलेच जमते असाही टोला छगन भुजबळ यांनी मोदी यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!