अमरावती : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे पुन्हा एकदा अश्याच वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अमरावतीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असतांना भिडेंनी डॉक्टरांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी बोलत असतांना संभाजी भिडे म्हणाले की,‘कोरोना काळात १०५ टक्के लोकांचा भीतीनेच मृत्यू झाला. डॉक्टर नालायक असून ते लुटारू आहेत.’ तसेच डॉक्टर मारायच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, असेही संभाजी भिडे यावेळी म्हणाले.
दरम्यान, संभाजी भिंडेंच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या वक्तव्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी असून डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- “सत्तेचा माज म्हणजे शिवसेना”, महिला मारहाण प्रकरणावरून भातखळकरांचा हल्लाबोल
- “… तर कोणतीही लढाई सहजरित्या जिंकता येते”, जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य
- पाकिस्तान दौरा मध्यात सोडत आयपीएल खेळण्यावर माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूचा आक्षेप
- ठाकरे सरकारच्या कृपेने राज्यात खंडणीचा धंदा जोरात- अतुल भातखळकर
- ठाकरे कुटुंबाच्या घरी हलणार पाळणा; ‘शिवतीर्थ’ वरून आनंदाची बातमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

