Share

‘वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा चित्रपटसारखी संजय राऊतांची अवस्था’ – आशिष शेलार

Published On: 

मुंबई: आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. तसेच या प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी दहशतवाद्यांविरोधात भूमिका घेतल्यास आम्ही त्यांचं स्वागत आणि समर्थनच करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आशिष शेलार म्हणाले, वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा चित्रपटसारखी संजय राऊतांची अवस्था, असा टोला शेलार यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, मलिक प्रकरणातील सत्य समोर यावं तसेच ही राजकीय अटक नाही. त्याची एक पार्श्वभूमी आहे. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये इक्बाल कासकर आणि मुमताज शेख विरोधात गुन्हे दाखल झाले होते. मालमत्ता बळकावणे आणि खंडणी मागणे आदी गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे, असं शेलार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!