सोलापूर: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. यावर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने नवाब मलिक यांच्यावर सुडाने कारवाई केल्याचा आरोप केला आहे. यावरच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी भाजपवर केलेले आरोप आम्ही खोडुन काढु असा इशारा दिला आहे.
भाजपने ‘नवाब मलिक हटाव, देश बचाव’ हे अभियान सुरु केले आहे. याद्वारे ठाकरे सरकारने लावलेले आरोप खोडुन काढु असे दरेकर यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी “खरे तर नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यायला हवा होता. पण सरकारने राजीनामा घेतला नाही. संजय राठोड यांच्यावर आरोप होताच त्यांचा राजीनामा घेतला. पण राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेईल की काय या भीतीने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई होत नाही. असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दरम्यान तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी एका मुलीला आत्महत्या करायला भाग पाडलं. हसन मुश्रीफ यांच्या जावयाने टेंडर घेतले. त्यांच्यावर आरोप झाले. नवाब मलिकांनी सोमय्यांना आयटम गर्ल म्हटले. नारायण राणे आणि नितेश राणेंवर कारवाई झाली. जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. यात भाजपने कुठेही तक्रार केली नव्हती. या सर्व प्रकरणात भाजपचा संबंध काय? असा सवालही दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. दरम्यान एका बाजूला साधूंसंताचा महाराष्ट्र सांगायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना फडिंग करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणून नवाब मलिक आरोपी होत नाहीत, असा जावई शोध महाविकास आघाडीने लावला असल्याचा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले…”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- केव्हिन पीटरसनने शेअर केली युक्रेनहून पोलंडला गेलेल्या कुटुंबावर उपडेट; पोलंड सरकारचे मानले आभार
- “सत्ता जाण्याच्या भीतीनेच उद्धव ठाकरे…”, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
- छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब- चंद्रकांत पाटील
- पंतप्रधान कार्यालयाला पुरावे सोपवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

