Share

राष्ट्रगीताला कसं उभं राहावं हे ज्याला कळत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळालाय- विनायक राऊत

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत वेगळी युती करून सरकार स्थापन केलं. त्यावेळी मुख्यमंत्री शपथ विधी दरम्यान राष्ट्रगीत सुरू असतानाचा एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांना खूप ट्रोल देखील करण्यात आलं होतं. परंतू अशातच हाच मुद्यावर पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केलं आहे.

राष्ट्रगीतासाठी कसं उभं राहावं हे ज्याला कळत नाही. असा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळावा, असं म्हणत विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना चांगलच फटकारलं आहे. विनायक राऊत एका कार्यकर्मामध्ये उपस्थित होते,. त्यावेळी ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळू-बाळू-

तसेच, विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळू-बाळू यांची उपमा देत चांगलंच डिवचलं आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या काळू-बाळू यांचा तमाशा सुरू आहे, एक दाढीवाला आणि एक बिनदाढीवाला, असं म्हणत विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा शपथ विधीच्या वेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना हालचाल करत असल्याचं दिसून आलं होतं. स्तब्ध उभं न राहता ते इकडे-तिकडे पाहत असल्याचं व्हिडीओमधून दिसून आलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!