पुणे : राज्यातील सत्ता संघर्षावर आज कोर्टात निर्णय होणार आहे. त्यामुळे उद्या न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष नक्की कोणाचा या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. याचपार्श्वभूमिवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी यासंबंधी एक वक्तव्य केलं आहे.
कोणताच पक्ष संपत नसतो. शिवसेना पक्षातील खालच्या पदाधिकाऱ्यांची अजूनही बाळासाहेब यांच्यावर निष्ठा आहे. खरी शिवसेना कोणाची हे सुप्रीम कोर्ट ठरवेल, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या’गणपती आमचा किंमत तुमची 2022′ या आयेजित उपक्रमाचे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
तसेच, शिंदे गटामुळे शिवसेना पक्षामध्ये खूप मोठी फूट पडली असून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकटे पडले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? असा सवाल शर्मिला ठाकरे यांना करण्यात आला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या की, त्यांनी साद घातली तर येऊ देत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास- उद्धव ठाकरे
- Eknath Shinde | मुंबईवर हल्ला करण्याची कोणी हिम्मत करणार नाही- एकनाथ शिंदे
- Uddhav Thackeray | आमच्याकडेही खोके येत आहेत मात्र आमच्या खोक्यांमध्ये निष्ठा आहे – उद्धव ठाकरे
- Vinayak raut | “महाराष्ट्रातील संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येणाच्या मानसिकतेत”; विनायक राऊतांचा दावा
- Swine Flu| ठाणे मध्ये स्वाईन फ्लू आजाराचं थैमान, मृत्यू संख्येतही वाढ


