पुणे : महाराष्ट्रातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा विषय नेहमीच चर्चेत असतो. आज ह्या विषयाला हात घातला आहे ते खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी. त्यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. तसेच माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं. पत्रकारांनी शर्मिला ठाकरे यांना सध्याच्या सरकारबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्यावर त्या म्हणाल्या की, “आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायला हवं की आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल. अजून तरी काही चांगलं झालेलं नाहीये. पण भविष्यात होईल कदाचित.”
पुढे त्या म्हणाल्या कि, “महाराष्ट्रात रस्त्यांची अवस्था खूप खराब आहे. जेव्हा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना एके दिवशी मी फोन करून हे सांगितलं होतं कि, जरा मुंबई-गोवा महामार्ग कडे लक्ष द्या. किती खड्डे आहेत त्या रस्त्यावर. त्यामुळेच माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र काही एखादं मागासलेले राज्य नाहीये. तुम्ही महाराष्ट्राची बॉर्डर पार केली सगळीकडे छान गुळगुळीत रस्ते पाहायला मिळतात. मग महाराष्ट्रातच का नाही? आपलेच राजकारणी मुद्दाम चांगले रस्ते बनवत नाहीत. त्यांनी तेवढ तरी काम करायला हवं. किती वर्ष झाली आता स्वातंत्र्याला. महाराष्ट्र हे सर्वात जास्त टॅक्स भरणार राज्य आहे. त्यामुळे रस्ते चांगले करण्याची मानसिकता राजकारण्याची हवी आणि म्हणूनच मला वाटतं की जेव्हा माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच कदाचित महाराष्ट्रातले रस्ते चांगले होतील.”,असा दावा शर्मिला ठाकरे यांनी केला
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Shirsat | अतुल सावे मागून आले अन् मंत्री झाले, आता आमच्याकडे पण पहा जरा – संजय शिरसाठ
- सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच सरकारची सर्वात मोठी समस्या – नितीन गडकरी
- Nilesh Rane | रत्नागिरीमध्ये निलेश राणेंचा ग्रामस्थांनी अडवला ताफा
- Amravati । अमरावतीत आज देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला होणार, आमदार रवी राणा यांच्यावतीने आयोजन
- उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास- उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

