Share

महाराष्ट्रात काळू-बाळू यांचा तमाशा सुरू आहे, एक दाढी वाला आणि एक बिनदाधीवाला- विनायक राऊत

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत वेगळी युती करून सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिवसेना पक्षातील नेते आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली पाहायला मिळते. अशातच शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळू-बाळू यांची उपमा देत चांगलंच डिवचलं आहे.

महाराष्ट्र राज्यात सध्या काळू-बाळू यांचा तमाशा सुरू आहे, एक दाढीवाला आणि एक बिनदाढीवाला, असं म्हणत विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली आहे. एका कार्यकर्मामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांशी विनायक राऊत बोलत होते.

तसेच, पुढे ते म्हणाले की, बिनदाढीवाल्या मनात आलं की खेचला माइक आणि दाढीवाला पडला उताना. त्याचबरोबर राष्ट्रगीतासाठी कसं उभं राहावं हे ज्याला कळत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळावा, असं म्हणत विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, शिवसेना आणि मनसे पक्ष पुन्हा एकत्र येणार का?, ‘त्यांनी साद घातली तर येऊ देत’ असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्यावरही विनायक राऊतांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, शिवसेनेकडे अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जरी प्रस्ताव आला तरी याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे निर्णय घेतील.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!