Share

Ashok Chavan | पिक विमा कंपन्या शासनाचं ऐकत नाहीत – अशोक चव्हाण

Published On: 

नांदेड – आज राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाडा विभागीय बैठक घेऊन मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाची माहिती घेतली. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. तर यावेळी चव्हाण म्हणाले की, “पिक विमा कंपन्या हे शासनाचे ऐकत नसून त्यांनी केलेल्या पंचनाम्यांनुसार शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो. प्रशासनाने सर्वे केलेल्या गोष्टी ग्राह धरल्या जात नाहीत. त्यामुळे कृषिमंत्र्यांनी याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करावी.”, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच पुढे ते म्हणाले, “केंद्र व राज्य हे दोघे मिळून 90 ते 95 टक्के प्रीमियर भरत असतात. शासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून विमा कंपन्यांनी निर्णय घेतला पाहिजे. नुकसान भरपाई म्हणून तेरा हजार सहाशे रुपये हे शेतकऱ्यांना कमीच आहेत. राज्यातील ८० टक्के शेतकरी हा दोन हेक्टर पेक्षा खालचा आहे. त्यामुळे ३ हेक्टर ची घोषणा करूनही 80 टक्के लोकांना त्याचा फायदा होत नाहीये. नांदेड जिल्ह्यामध्ये बरीच जनावरे दगावली असून त्यांना अद्याप काहीच नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी.” असं अशोक चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!