सोलापूर : शिवसेना खासदार विनायक राऊत हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर सडकून टीका केली. तसेच ‘काय झाडी, काय डोंगर… या डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “शहाजीबापू पाटील यांच्यासारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो पण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. हे सांगोल्याच्या मतदारांनी ठामपणे दाखवून दिल आहे. शाळेतील विद्यार्थीपण म्हणत आहेत कि ‘नॉट ओके’… शिवसेना विल बी ओके”, असं विनायक राऊत यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. “महाविकास आघाडीच्या काळात ज्या पद्धतीने चित्रा वाघ संजय राठोड यांच्यावर तुटून पडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राठोडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्या करत होत्या. त्यांना एवढाच प्रश्न आहे कि, आता तुम्ही कोणत्या शब्दात राठोडांना क्लिनचीट देणार? ते सांगितलं तर बरं होईल. आता चित्रा वाघ यांना मुद्दाम आंधळेपण स्वीकारावं लागेल, असं वाटत आहे. शिंदे गट आणि भाजप सत्तेत येताच संजय राठोड धुतल्या तांदळासारखे झाले आहेत. मात्र राठोडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या चित्राताई एका बाजूला आणि आता राठोडांची भलामन करणाऱ्या चित्रा वाघ एका बाजूला आहेत.”, या शब्दात राऊत यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Shirsat | अतुल सावे मागून आले अन् मंत्री झाले, आता आमच्याकडे पण पहा जरा – संजय शिरसाठ
- सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच सरकारची सर्वात मोठी समस्या – नितीन गडकरी
- Nilesh Rane | रत्नागिरीमध्ये निलेश राणेंचा ग्रामस्थांनी अडवला ताफा
- Amravati । अमरावतीत आज देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला होणार, आमदार रवी राणा यांच्यावतीने आयोजन
- उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास- उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

