🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत आहेत. त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोमय्या हे शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सोमय्यांकडून आता शिवसेनेतील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी यासाठी सोमय्या आज शेकडो कार्यकर्त्यांसह दापोलीत दाखल झाले आहेत. त्यांनी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्यांनी हात वर करत हातोडा दाखवला. महाराष्ट्रात फक्त घोटाळा, भ्रष्टाचार व दादागिरी करणारे सरकार होते. कोव्हिडमध्ये कमाई करायचे काम मंत्री आणि नेते करत होते. त्या पैशातून मंत्री अनिल परब समुद्र किनीरी रिसॉर्ट बांधत होते, असं ते म्हणाले.
परब यांनी या रिसॉर्टच्या रूपाने महाविकास आघाडीच्या घोटाळ्याचे प्रतीक बांधायचे काम केले आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीर साई रिसॉर्ट वाचावे यासाठी प्रयत्न केले, असा आरोप त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हे भ्रष्टाचाराचे प्रतीक रिसॉर्ट पडायचे आदेश दिले आहेत. मात्र यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ट पाडण्याचा अॅक्शन प्लान सोमय्या पाहणार आहेत. प्लान नसेल तर आम्ही जाऊन रिसॉर्ट तोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करू असं सोमय्या म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad | “आमची झोप मोडून जर रेल्वे प्रवास करणार असेल तर… “; आव्हाडांचा इशारा
- India vs Pakistan | भारताने टॉस जिंकला! जाणून घ्या, भारताची प्लेइंग इलेव्हन!
- India vs Pakistan | पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली शतक ठोकणार? टीम इंडियाने आधीच केले अभिनंदन, जाणून घ्या…
- आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे जगनमोहन रेड्डी ?
- Aditya Thackeray | गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे – आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
