Share

“महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने नवे मामू मिळाले”; दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याला जाण्याचे जाहीर केल्यानंतर यावर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेतेही टीका करत असताना पाहायला मिळत आहेत. आता मनसे आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. अयोध्येतील दौऱ्यावरून राज ठाकरेंना आव्हान देताना दिपाली सय्यद यांनी “सभा घ्यायच्याच असतील, तर अयोध्येमध्ये घेऊन दाखवा. पुण्यामध्ये तर सिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून”, असं ट्वीट केलं होतं. यानंतर आता त्यांनी पुन्हा व्हिडीओ शेअर करत मनसेवर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेल्या मुन्नाभाई या उपमेचा उल्लेख करत राज ठाकरेंवर दिपाली सय्यद यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निशाणा साधला आहे. “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले. भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले. आयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले. महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले”, असे दिपाली सय्यद यांनी व्हिडीओमध्ये म्हंटले आहे.

अयोध्या दौऱ्यावरून दिपाली सय्यद काय म्हणाल्या होत्या?

भाजप नेते आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा अजूनही राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध आहे. राज ठाकरे यांनी माफी मागावी, मगच अयोध्येला यावे, या भूमिकेवर बृजभूषण सिंह ठाम आहेत. असे असतानाही मनसेकडून अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू आहे. कार्यकर्त्यांची नावनोंदणी, रेल्वे आरक्षण या गोष्टींना सुरुवात करण्यात आली आहे. अशातच दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. “भीती वाट असेल, तर आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला येऊ शकता”, असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!