Share

“…गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते गप्प का बसतात?”, रोहित पवारांचा प्रवीण दरेकरांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यात ट्विटर वार सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावरच रोहित पवार हे अजून लहान असून चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया द्यायला शरद पवार आणि अजित पवार आहेत. त्यामुळे रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सल्ला देऊ नये, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते. यावरच आता रोहित पवार (rohit pawar) यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.

“दरेकर साहेब वयाचा विचार करायचा तर आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा ‘छंद’ आपल्याला दिसत नाही का? अशांना महत्त्व देत नाही, पण ते गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात?”, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

तसेच मोठ्या नेत्यांना सल्ला देणं/त्यांच्यावर हल्ला करण्याएवढा मी मोठा नसल्याची मला जाणीव आहे. पण राज्यातील तुमच्या पक्षातील मोठ्या नेत्यांकडून राजकीय समंजसपणाची अपेक्षा करणं काही गैर नाही. कारण मोठे नेतेच चुकीचं वागले तर त्याचं अनुकरण लहानही करत असतात. आणि हेच मोठे नेते चुकीचं समर्थन करत असतील तर महाराष्ट्रात आजवरच्या नेत्यांनी निर्माण केलेल्या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला तडा जाण्याचीही भीती वाटते. महाराष्ट्राप्रमाणे देशात इतरत्र कुठंही दिसत नसलेली ही राजकीय संस्कृती खरंतर आपण सर्वांनीच जपायला हवी. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!