Share

“…त्याची किंमत मलासुद्धा कधीकधी मोजावी लागली”, शरद पवारांनी सांगितली बाळासाहेबांशी संबंधित आठवण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी काल (१८ मे) मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांमधून त्यांच्या आठवणींना यावेळी शरद पवारांनी उजाळा दिला.

ज्यांना आयुष्यात कधीही विधानसभा आणि संसद माहीत नव्हती त्या लोकांना बाळासाहेबांनी मोठमोठ्या पदांवर बसवलं. त्यामुळे अशा या मोठ्या व्यक्तीचं आज या ठिकाणी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. अत्यंत देखणं असं हे प्रदर्शन आहे. बाळासाहेब स्वत:ही एक कलाकार आणि व्यंगचित्रकार होते. त्यांच्या व्यंगचित्रांना एक प्रकारची धार असायची. त्या धारेचा विरोधकांवर जो काही परिणाम व्हायचा त्याची किंमत मलासुद्धा कधीकधी मोजावी लागली. अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

पुढे ते म्हणाले की, “मला आठवतंय, मी पूर्वी खेडगल्ली, दादर येथे राहायला होतो. त्याच काळात नुकतीच शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली होती. ज्यावेळेस राजकारणात माझ्या खांद्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली, त्याचवेळेस शिवसेनेचा महाराष्ट्रभर प्रसार होत होता. आम्ही दोघांनीही भाषणांमधून एकमेकांवर खूप टीका केली. त्याकाळात आम्ही दिवसभर कुठेही असलो तरी संध्याकाळी एकत्र असायचो.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!