Share

जितेंद्र नवलानी प्रकरणाची स्थिती काय आहे?; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र नवलानी यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे करत गंभीर आरोप केले होते. यासंदर्भातच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जितेंद्र नवलानी प्रकरणाची स्थिती काय आहे, असा सवाल ठाकरे सरकारला केला आहे.

“ठाकरे सरकार स्पष्ट करू शकते का, जितेंद्र नवलानी प्रकरणाची स्थिती काय आहे? तपास कोण करत आहे? ईओडब्ल्यू की एसीबी पोलीस मुंबई? EOW मुंबई पोलिसांच्या SIT विशेष तपास पथकाचे काय झाले? एसीबीची प्राथमिक चौकशी किती दिवसांत झाली? तसेच ही चौकशी EOW की ACB द्वारे झाली?”, असे अनेक सवाल किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत केले आहेत.

नेमके संजय राऊत काय म्हणाले होते ?

जितेंद्र नवलानी हे अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीचे वसुली अधिकारी म्हणून काम करत आहेत. जितेंद्र नवलानी हे ७ कंपन्याचे संचालक असून त्यांनी या सात कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या बिल्डर्सनी शेकडो कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये आयकर विभागाने नवलानी आणि त्यांच्या पत्नीला बेनामी संपत्तीप्रकरणी नोटीसही पाठवली होती. असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

जितेंद्र नवलानी आणि किरीट सोमय्या यांचा काय संबंध?

जितेंद्र नवलानी यांच्या सात कंपन्यामध्ये करोडो रूपये ट्रान्सपर केले जातात. है सर्व पैसे दिल्ली मुंबईत बसलेल्या ईडी अधिकाऱ्यांसाठी ट्रान्सपर केले जातात. मात्र याच्याशी किरीट सोमय्या यांचा काय संबंध आहे? सोमय्यांनी हे स्पष्ट करावं. असे आव्हान त्यावेळी संजय राऊत यांनी दिले होते. मात्र हे सर्व आरोप सोमय्या यांनी फेटाळून लावले होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!