Share

अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न

Published On: 

मुंबई : बॉलीवूड आणि क्रिकेटचे नाते हे खुप जवळचे. अनेक बॉलीवूड अभिनेत्रीनी क्रिकेटपटुंशी लग्न करुन संसार थाटला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण. तसेच अनेक क्रिकेटपटु आणि अभिनेत्रीच्या प्रेमप्रकरणाचे किस्से नेहमीच ऐकायला मिळत असतात. यात आता एका नव्या क्रिकेटपटुचे नाव समोर आले आहे. हा क्रिकेटपटु दुसरा कोणी नसुन भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे आहेत.

१९व्या दशकात रवी शास्त्री हे भारतीय संघाचे महत्वाचे खेळाडू होते. अनेक सामन्यात त्यांनी अष्टपैलु कामगीरी करत भारतीय संघाला विजय मिळवुन दिला होता. मैदनातील कामगिरी व्यतिरीक्त त्या काळात त्यांचे एक प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. त्याकाळातील आघाडीची अभिनेत्री अमृता सिंगसोबत त्यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. रवी शास्त्री आणि अमृता सिंग हे मॅगझिनच्या मुख पृष्ठावर झळकले होते. त्यांनतर या दोघांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. या दोघांनी साखरपुडाही केला होता. मात्र लग्न होऊ शकले नाही.

कारण रवी शास्त्री यांनी लग्नाआधी एक अट ठेवली होती. ती म्हणजे अमृताने लग्नानंतर चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम करावा आणि घर संभाळावे. त्यावेळी अमृता नुकतीच बॉलीवूडमध्ये दाखल झाली होती. त्यामुळे अमृताने ही अट मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे साखरपुड्यानंतर रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांचा विवाह होऊ शकला नाही. पुढे जाउन रवी शास्त्री यांनी १९९० मध्ये रितु सिंगशी विवाह केला. तर अमृता सिंगने सैफ अली खानसोबत १९९१ मध्ये विवाह केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!