Share

‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा

Published On: 

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. दरम्यान राज्यातील सरकारमधील नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन मतांतर असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. काँग्रेसचे सरकारमधील स्थान यावरुन विरोधक अनेकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतात. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातही अनेकदा शाब्दिक युद्ध रंगल्याचे पहायला मिळालं आहे. दरम्यान नाना पटोले यांनी नुकतंच शिवसेना आणि राष्ट्रवादीला डिवचणारे वक्तव्य केले आहे.

नाना पटोलेंनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचे स्थान याविषयी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सडेतोडपणे काँग्रेसची भूमिका मांडली. ‘यापूर्वीही अनेकदा आम्ही सांगितले आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही. तेच आमच्या नेत्यांनीही सांगितले आहे. सरकारमध्ये आमची खूप सारी भागीदारी नाही. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत आमचे नाते जोडले गेले आहे’, असे पटोले म्हणाले.

२०१९मध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं ८० दिवसांचं सरकार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारनं कारभार सुरू केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांचं राज्यात सरकार आलं. मात्र, सुरुवातीपासूनच विरोधकांकडून टीका केली गेली त्याप्रमाणे सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये वेळोवेळी मतभेद असल्याचं समोर आलं आहे. विशेषत: काँग्रेसकडून वारंवार यासंदर्भात जाहीर भूमिका देखील घेतल्या गेल्या. हे मतभेद अजूनही कमी झाले नसल्याचे वारंवार समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!