बीड: प्रशासनाने परवानी दिली तर उत्तम नाही दिली तरीही हा मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे, अशी माहिती शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी बीडमधून ५ जून रोजी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात रविवारी बैठक पार पडली. प्रशासनाने परवानगी नाही दिली तरी देखील हा मोर्चा निघणार असल्याचे मेटेंनी स्पष्ट केले आहे.
बीडमध्ये या निकालानंतरचा राज्यातील पहिला मोर्चा ५ जून रोजी निघणार असल्याची घोषणा आमदार विनायक मेटेंनी केली होती. दरम्यान, कोरोनाचा काळ पाहता या मार्चाचे काय होणार हा प्रश्न होता. दरम्यान, मोर्चा निघण्यावर रविवारी झालेल्या बैठकीत ठाम निर्णय घेतला गेला असून प्रशासनाने परवानगी नाकारली तरी हा मोर्चा होणार आहे. मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता सरकारवर दबाव वाढत आहे. आरक्षण प्रश्नी मराठा समाज आक्रमक झाला आहे.
५ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघेल. याचे पूर्ण नियोजन करण्यात आले असून हा मोर्चा मूक राहणार नाही तर यातून सरकारला समाजाचा आक्रोश दिसेल, असे मेटे म्हणाले. या मोर्चाचे नाव मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा असे असणार आहे. नियोजन व जनजागृतीसाठी ९ समित्यांची स्थापना केली गेली असून या समित्यांनी कामही सुरू केले आहे. कोरोनाचे नियम पाळून मोर्चेकरी यात सहभागी होतील, असेही आमदार मेटे म्हणाले. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्ह्यातील समन्वयकही उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
- उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’
- मोदींच्या अश्रूंची खिल्ली उडवणार्यांवर बरसली कंगना, म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

