Share

उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’

Published On: 

मुंबई : २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ज्या ‘गुजरात मॉडेल’चा डंका पिटवून देशातील सत्ता काबीज केली त्याच गुजरातमध्ये कोरोनाची दुसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याने प्रसारमाध्यमांनी खरी वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाडे काढले. तसेच गुजरात उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करीत खडे बोलही सुनावले. यामुळे गुजरातचे ‘अकार्यक्षम मॉडेल’च आता देशापुढे उघड झाले आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय पॅनल प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली.

उत्तर प्रदेशात एकीकडे एका मैदानात सामुदायिकरीत्या शेकडो प्रेतांना अग्नी दिला जात असल्याची छायाचित्रेच परदेशी वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली, तर दुसरीकडे पवित्र गंगेतून प्रेत वाहत असल्याची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली. उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’ बनत चालले असल्याचे गाडगीळ यांनी म्हटले आहे.

गोव्यामध्ये ऑक्सिजनअभावी शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. कर्नाटकमध्ये तर स्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की बंगळुरू शहरात महापालिकेला एकूण १३ पैकी आता ७ स्मशानभूमी या ‘कोरोना मृतांसाठी राखीव’ ठेवाव्या लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरातील वरील राज्यांतर्गत परिस्थितीच्या सर्वेक्षणानंतर भाजपची सरकारे असलेल्या राज्यातच ‘मोदी मॉडेल’चा फज्जा उडाला असल्याची टीका गाडगीळ यांनी केली आहे. त्यामुळे या राज्यांना आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे गाडगीळ यांनी या वेळी बोलताना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!