🕒 1 min read
वाढत्या वयाबरोबर प्रत्येक महिलेला आपल्या शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवयला लागतो. कारण कामाच्या आणि जबाबदारीच्या टेन्शन मध्ये महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू लागतात. पण काही वेळा हा थकवा आणि अशक्तपणा एवढा वाढतो की त्यामुळे महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांना थकवा आणि अशक्तपणा दूर करायचा असेल तर तुमच्या आहारात योग्य तो बदल करून जास्तीत जास्त पोषक घटकांचा समावेश करा. यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असायला पाहिजे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सुका मेवा
प्रत्येकाने विशेषतः महिलांनी आपल्या आहारात सुक्या मेवाच्या समावेश करावा. कारण यामध्ये बरीच पोषक घटक असतात. सुका मेवा खाल्याने शरीराला एनर्जी मिळते आणि थकवा व अशक्तपणा ही दूर होतो. त्याचबरोबर सुका मेवा खाल्याने वजन वाढत नाही आणि पचनक्रिया देखील सुरळीत होते.
दुध
दुध हे सर्वात पोषक मानले जाते. त्यामुळे महिलांनी आपल्या दररोजच्या आहारात दुधाचा समावेश करावा. दुध आपल्या शरीराला आवश्यक ती तत्त्वे मिळवून देतात. दुधामुळे शरीराला कॅल्शियम मिळते. दुध पिल्याणे स्नायू दुःखी सुध्दा कमी होऊ शकते.
पाणी
रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पाणी कमी पितो. आणि कमी पाणी पिण्याने शरीरात थकवा आणि अशक्तपणा वाढतो. त्यामुळे बॉडी डीहायड्रेट होते. स्वतःआ हायड्रेट आणि एनर्जेटिक ठेवायचे असेल तर दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या. शरीराला व्यवस्थित पाणी मिळाल्यावर पचनशक्ती ही सुधारते.
फळे
जर तुम्हाला तुमच्या शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर करायचा असेल तर तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करा. प्रामुख्याने केळी, सफरचंद डाळिंब आणि इतर हंगामी फळांचा रोजच्या आहारात समावेश करा.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी
- Tata New Vehicles Launch | टाटा मोटर्सने केले तीन नवीन पिक-अप वाहने लाँच
- Atul Bhatkhalkar | “… करण्यासाठीच शाळेत सरस्वतीचे, शारदेचे फोटो असतात” छगन भुजबळ यांना अतुल भातखळकरांचं प्रत्युत्तर
- Viral Video | ‘त्या’ चिमुकल्याच्या आवाजाची दखल थेट अजय-अतुलने घेतली ; चंद्रा गाण्यामुळे झाला होता व्हिडिओ व्हायरल
- Chagan Bhujbal | “शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे?”, छगन भुजबळ यांचं वादग्रस्त वक्तव्य
- Navneet Rana | नवनीत राणांना नाही आवरला गरबा खेळण्याचा मोह, पाहा व्हिडीओ
- Shivsena | शिवसेना कोणाची? निकालाबाबत स्पष्टच बोलले उज्ज्वल निकम, म्हणाले…

