Share

Navneet Rana | नवनीत राणांना नाही आवरला गरबा खेळण्याचा मोह, पाहा व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : बहुविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नृत्यानं अनेकांचंच लक्ष वेधलं. अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी शहरातील गरबा उत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी नवनीत राणा यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली असून यावेळी नवनीत राणा यांना गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर नवनीत राणांनी तरुणांसोबत गरबा खेळण्यास सुरुवात केली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवनीत राणा यांनी गुजराती गाण्यावर धरला ठेका :

गुजराती आणि हिंदी गाण्यावर नवनीत राणांनी ठेका धरला. नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी आता रास गरब्याचे आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी दांडियावर तरुणाईने ठेका धरला आहे. खासदार नवनीत राणा यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. तरुण-तरुणींसोबत नवनीत राणा यांनी गुजराती गाण्यावर चांगला ठेका धरला.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदाचा नवरात्रोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होत असल्याने सर्वत्र मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!