🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करुन राज्यात सत्ता मिळवली. बंड करुन त्यांनी उद्धव ठाकरे यांना झटका तर दिला होताच. मात्र, एवढ्यावरच शांत न बसता त्यांनी शिवसेना पक्षावर देखील त्यांचा दावा केला. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया :
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात उपस्थित झालेले मुद्दे पहिल्यांदाच उभे राहिले आहेत, असं याआधी कधीच झालं नव्हतं, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. आजच्या सुनावणीमध्ये प्रामुख्याने निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यायची की नाही, याबाबत युक्तिवाद होईल आणि यात मुलभूत प्रश्नाबाबत घटनापीठ विचार करुन काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, असं देखील निकम म्हणाले.
उज्जवल निकम यांनी सांगितल्याप्रमाणे, सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी घटनापीठासमोर 11 प्रश्न उपस्थित केले आहेत. पाच सदस्यांच्या घटनापीठाला या प्रश्नांबाबत निकाल देताना विचार करावा लागणार असून सोबत राजकीय पक्षांमध्ये फूट पडली, तर निवडणूक आयोगापुढं काय अधिकार असतील, हे देखील निकालातून स्पष्ट करावं लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
धनुष्यबाण कुणाचं, याचा निकाल आज तातडीने लागण्याची शक्यता फार तुरळत:
दरम्यान, धनुष्यबाण कुणाचं, याचा निकाल आज तातडीने लागण्याची शक्यता फार तुरळत असल्याची माहिती निकम यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईबाबत सुप्रीम कोर्ट स्थगिती देतं की कारवाईसाठी परवानगी देतं, हे प्रामुख्यानं पाहावं लागेल, असं निकम यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | आदित्य ठाकरेंवर कायदेशीर कारवाई का करु नये? – आशिष शेलार
- Sanjay Rathod | संजय राठोडांच्या कृतघ्नतेने महंत दुखावले, सुनील महाराज शिवबंधनात अडकणार
- Shivsena | महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष! आज घटनापिठापुढे होणार ‘सुप्रिम’ सुनावणी
- Shivsena । बाळासाहेबांचे आवडते थापा, शिंदे गटात का गेले? यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
- Shambhuraj Desai | लोकहिताच्या कामांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गतीने कामे करावीत ; शंभूराज देसाई यांचे निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
