Share

Viral Video | ‘त्या’ चिमुकल्याच्या आवाजाची दखल थेट अजय-अतुलने घेतली ; चंद्रा गाण्यामुळे झाला होता व्हिडिओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

सोशल मीडिया वर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक शाळकरी मुलगा ‘ चंद्रा ‘ गाणं गाताना दिसला आहे.

या व्हिडीओ मध्ये एक शाळकरी मुलगा आपल्या वर्गात बाकाजवळ उभा राहून ‘चंद्रा’ गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींकडून देखीलही हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओ मधील तो शाळकरी मुलगा म्हणजे जयेश खरे. जयेश हा सहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. या व्हिडिओ नंतर त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. जयेशच्या या व्हिडिओ नंतर माध्यमांसोबतच अजय – अतुल देखील त्याच्या पर्यंत पोहचले आहेत. आणि त्यांनी त्याला एक विशेष संधी देखील दिली आहे. जयेशला छोट्या शाहीर साबळेंच्या आवाजातील गाणे गाण्यासाठी साइन केले आहे.

चंद्रा गाणे गाऊन नेवाशाजवळच्या एका छोट्या गावातील जयेशला अजय-अतुल यांनी त्यांच्या आगामी ‘ महाराष्ट्र शाहीर ‘ या चित्रपटात गायची संधी दिली आहे. जयेश शिर्डीजवळील राहुरीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या एका गावात राहणारा सामान्य  कुटुंबातील मुलगा आहे. त्याने त्याच्या शाळेत गायलेल्या ‘चंद्रा’ गाण्याचा व्हिडिओ यूट्यूब वर व्हायरल झाला होता. हे गाणे जेव्हा संगीतकार अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी शाहीरांच्या लहानपणीचे गाणे जयेशकडून गाऊन घ्यायचे ठरवले. अजय-अतुल त्याला मुंबईत घेऊन आले आणि त्याच्याकडून २ दिवस सरावही करून घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!