Share

Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी शिवसेना खासदार संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. अनेक वेळा त्यांच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे. अशातच संजय राऊत यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केला होता त्यावर सुनावणीसाठी अनेक तारखा आल्या होता. मात्र सुनावणी पार पडली नाही, अशातच आता नवीन तारीख समोर आलेली आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी :

ईडीकडून संजय राऊतांचा युक्तीवाद होणार असून येत्या १० ऑक्टोंबरला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे 10 तारखेला सुनावणी झाली तर संजय राऊत यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना सामान्य नियमांनुसार इतर कैद्यांना ज्या सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यांना लिहिण्यासाठी पेन आणि रजिस्टर देण्यात आले आहेत. मात्र ते लिखाण तुरुंगातून बाहेर जाऊ नये, तसेच कारागृहात काय लिहितात, याची पुरेपूर काळजी कारागृह प्रशासन घेत आहे.

कैदी क्रमांक 8959 अशी आहे ओळख:

संजय राऊतांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी वागणूक देण्यात आलेली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. कैदी क्रमांक 8959 अशी त्यांची ओळख आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!