🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे. अशातच आणखीन नेत्यांची या वादात उडी घेण्याची शक्यता असताना भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
अतुल भातखळकर यांचं प्रत्युत्तरः
आपल्याकडे येणारी लक्ष्मी ही सरस्वतीचा पदर धरून यावी असे प्रामाणिकपणाचे संस्कार मुलांवर करण्यासाठीच शाळेत सरस्वतीचे, शारदेचे फोटो असतात, असं उत्तर अतुल भातखळकर यांनी दिलं आहे. तसेच फक्त प्रामाणिकपणे लक्ष्मी कमावणाऱ्या माणसालाच त्या फोटोंची किंमत कळू शकते. बाकीच्यांनी त्या फंदात पडूही नये, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
पाहा ट्विट:
आपल्याकडे येणारी लक्ष्मी ही सरस्वतीचा पदर धरून यावी असे प्रामाणिकपणाचे संस्कार मुलांवर करण्यासाठीच शाळेत सरस्वतीचे, शारदेचे फोटो असतात.
फक्त प्रामाणिकपणे लक्ष्मी कमावणाऱ्या माणसालाच त्या फोटोंची किंमत कळू शकते. बाकीच्यांनी त्या फंदात पडूही नये. pic.twitter.com/KMq4BmMnJF— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 27, 2022
काय म्हणाले होते छगन भुजबळः
दरम्यान, देवी सरस्वतीला कुणी पाहिलं आहे का? असा थेट सवाल भुजबळांनी कार्यक्रमात केला आहे. तसेच पाहिलं असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं देखील भुजबळ म्हणाले होते. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणी देखील भुजबळांनी केली आहे.
दरम्यान, भुजबळांना उत्तर देत, सरस्वती, शारदा यांना कोणीच पाहिले नाही. उद्या गणपती चे फोटो पण नाकारणार का? हिंदू दैवतांचाच यांना राग का आहे असा सवाल दवे यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video | ‘त्या’ चिमुकल्याच्या आवाजाची दखल थेट अजय-अतुलने घेतली ; चंद्रा गाण्यामुळे झाला होता व्हिडिओ व्हायरल
- Chagan Bhujbal | “शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे?”, छगन भुजबळ यांचं वादग्रस्त वक्तव्य
- Navneet Rana | नवनीत राणांना नाही अवरला गरबा खेळण्याचा मोह, पाहा व्हिडीओ
- Shivsena | शिवसेना कोणाची? निकालाबाबत स्पष्टच बोलले उज्ज्वल निकम, म्हणाले…
- Radhakrishna Vikhe Patil | अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात – राधाकृष्ण विखे-पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
