Share

Chagan Bhujbal | “शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे?”, छगन भुजबळ यांचं वादग्रस्त वक्तव्य

Published On: 

मुंबई : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे. अशातच आणखीन नेत्यांची या वादात उडी घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता पुन्हा नवनी वादाला सुरुवात होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

छगन भुजबळ यांचं वादग्रस्त वक्तव्यः

देवी सरस्वतीला कुणी पाहिलं आहे का? असा थेट सवाल भुजबळांनी कार्यक्रमात केला आहे. तसेच पाहिलं असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं देखील भुजबळ म्हणाले.

शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे.

आनंद दवे यांचं प्रत्युत्तर:

दरम्यान, भुजबळांना उत्तर देत, सरस्वती, शारदा यांना कोणीच पाहिले नाही. उद्या गणपती चे फोटो पण नाकारणार का? हिंदू दैवतांचाच यांना राग का आहे असा सवाल दवे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!