Share

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटातील ‘या’ नेत्याची आमदारकी धोक्यात, कारवाई होणार?

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात मोठा सत्ता संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार अल्पमतात आल्याचे सांगितले जात आहे. जवळपास ४६ आमदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना आहे. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची गटबाजी मजबूत होत आहे. तर उद्धव ठाकरेंपासून एक एक करून आमदार वेगळे होताना दिसत आहेत.

तसेच एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे. राजकीय पक्षातून बाहेर पडणाऱ्या गटाकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक संख्याबळ असेल तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. अपक्षांनाही तो कायदाच लागू होत नाही, असं लोंढे म्हणालेत.

पुढे ते म्हणाले कि, पण अपक्ष आमदाराने एखाद्या राजकीय पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले असेल तर त्यांना हा कायदा लागू होतो. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. त्यामुळे ते या कायद्यानुसार कारवाईस पात्र ठरतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी पावले उचलली जातील, असा दावा लोंढे यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!