Share

भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार कायरन पोलार्ड नाराज

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत १ वर्षाने मायदेशात एकदिवसीय मालिका खेळात आहे. दिनांक ६ फेब्रुवारी पासून वेस्टइंडीज विरुद्ध भारताची एकदिवसीय मालिका सुरु झाली. अहमदाबाद येथील श्री. नरेंद्र मोदी या मैदानावर भारताची वेस्टइंडीज विरुद्धची ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. ६ फेब्रुवारी रविवार रोजी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्टइंडीजचा ६ गडी राखून पराभव केला आहे. भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर, युझवेन्द्र चहेल याच्या प्रभावी फिरकी माऱ्यासमोर वेस्टइंडीजचा डाव १७६ धावांवर गुंडाळला गेला.

तर भारतातर्फे रोहित शर्मा याने तडाखेबाज फलंदाजी करत ५१ चेंडूत ६० धाव केल्या आणि भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. भारताचा हा १००० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यावर भारताने तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा भारतीय एकदिवसीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यावर भारताचा हा पहिलाच एकदिवसीय सामना होता. गोलंदाजीत युझवेंद्र चहेल आणि फलंदाजीत रोहित शर्मा यांच्या प्रभावी माऱ्यासमोर वेस्टइंडीज संघाचा निभाव लागला नाही.

वेस्टइंडीजच्या या दारुण पराभवानंतर कर्णधार कायरन पोलार्ड काहीसा नाराज झालेला  दिसला. तो म्हणाला कि, ” भारताविरुद्ध आम्ही पूर्ण ५० षटके पण खेळू शकलो नाही ही अत्यंत शरमेची बाब असून आम्ही २२ षटकच फलंदाजी करू शकलो. ही वेस्टइंडीज क्रिकेटसाठी  लाजिरवाणी गोष्ट असली तरी आम्ही या पराभवावर नक्कीच मंथन करू आणि आज झलेल्या चुका दुरुस्त करायच्या प्रयत्न करू. वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने पण भारताविरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर ” आम्हाला अश्या सुरवातीची अपेक्षा नव्हती पण आम्ही बुधवारी पुन्हा येथेच येऊन चांगला खेळ करू अशी अपेक्षा” असे ट्विट केले.

 महत्वाच्या बातम्या : 

   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!