Share

“राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत, पोलिसांना कोणी वाली उरला नाही”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशनवर अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत विश्वनाथ नगरमध्ये डीजे सुरु असताना पोलिसांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर ८ ते १० जणांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. यात पोलीस स्टेशनमधील मोठ्या प्रमाणावर फर्निचरची तोडफोड झाली आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे वाढदिवसादरम्यान डीजेला मज्जाव केल्याने पोलीस स्टेशनवर ८ ते १० समाज कंटकांनी हल्ला केला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. पोलिसांनाही वाली उरलेला नाही.’, असे ट्विट आ. भातखळकरांनी केली आहे.

शेगाव पोलिसांना ६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री एकच्या सुमारास एका वाढदिवसाच्या पार्टीत डीजे सुरु असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि डीजे बंद करायला लावला. यानंतर काही वेळातच पोलीस ठाण्यावर ३० जणांचा जमाव धावून गेला. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात पोलीस ठाण्यातील सामानाची तोडफोड करण्यात आली आहे.

जमावाकडून पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. थेट पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या या समाजकंठकांविरोधात पोलीस काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!