🕒 1 min read
मुंबई: भारतरत्न, गाणकोकिळा लता मंगेशकर यांचे वयाच्या ९३ वर्षी काल रविवार दि. ०६ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालायत निधन झाले. त्यावेळी संपूर्ण भारत देशाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनेक दिग्गज नेते, कलाकार मंडळी तसेच संगीत विश्वातील मोठी मंडळी आणि लाखों रसिकांनी जड अंतकरनाने त्यांना निरोप दिला.
बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान याने त्याच्या व्यवस्थापक पूजासोबत येऊन लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या इस्लाम धर्माप्रमाणे दुआ (पार्थना) केली. परंतु काही ठिकाणी याची प्रशंसा झाली तर काही ठिकाणी वाद निर्माण झाला. शहारूख खान याने लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकले असे काहींचे म्हणणे आहे. परंतु ते थुंकणे नसून फुक मारणे होते. भाजपचे हरयाणाचे पदाधिकारी अरुण यादव यांनी ट्विट करत हा वाद सुरू केला होता.
फुंकर मारण्यामागे काय आहे इस्लामिक प्रथा जाणून घ्या:
इस्लाम नुसार जेव्हा कोणी व्यक्ती आजारी असते किंवा तिला नजर लागली असते. तेव्हा एक दुआ बोलून झाल्यावर ती दुआ किंवा प्रार्थना त्या व्यक्तीच्या शरीरपर्यंत पोहोचण्यासाठी फुक मारली जाते. तसेच त्याबद्दल अजून माहिती अशी आहे की, इस्लाम मध्ये काही लोक फुक मारून जादू करण्याचे काम करतात, त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी दुआ करून फुक मारली जाते.
काय असते दुआ: “इन्ना लिल्लाहि व इन्ना इलयही राजि’ऊन”
एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यावर त्याच्या अंत विधिला ही दुआ वापरली जाते. “इन्ना लिल्लाहि व इन्ना इलयही राजि’ऊन” म्हणजे आपण सर्व निर्विवाद अल्लाह ची संपत्ती आहोत आणि निर्विवादपणे एक दिवस आपण त्याच्याकडे जाणार आहोत. त्यानंतर फुक मारणे म्हणजे आपली दुआ कबूल करून घेणे.
महत्वाच्या बातम्या:
- “तीन महिने उठला नाही पाहिजे असा मारण्याचा कट होता”, किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप
- यापुढे सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड ठेवणार; राज्य शासनाचा निर्णय
- राम कदम यांच्या पत्रावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,‘लतादीदींचे स्मारक बनवणे…’
- धर्म संसदेतील वादग्रस्त वक्तव्यांवर आरएसएस विश्वास ठेवत नाही- मोहन भागवत
- “लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कात स्मारक बांधा”, राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
