🕒 1 min read
मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसोबत विराट कोहलीचा कर्णधारपदाचा कार्यकाळ आयपीएलच्या १४व्या हंगामात म्हणजेच २०२१ मध्ये संपला. त्याला कर्णधार म्हणून संघासाठी एकही विजेतेपद मिळवता आले नाही. दोनदा फायनल मध्ये पोहचून सुद्धा त्यांना एकदाही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. यासंबंधी विराटने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
आरसीबीसोबत पॉडकास्ट मध्ये बोलताना विराट कोहलीने याबद्दल सांगितले आहे. ” २०१६ फायनल, मला असे वाटते कि ते लिहलेलेच होते. बँगलोरमध्ये फायनल कशी होऊ शकते, आम्ही त्या प्रकारचा सीजन खेळल्यानंतर, आणि आम्ही ९ षटकांनंतर १००-०असा खेळ खेळत होतो. आजपर्यंत जेव्हा ती मॅच दाखवली जाते , तेव्हा के एल त्याचे स्क्रीनशॉट घेतो आणि म्हणतो याचे दुःख अजूनही आहे.” आयपीएल २०१६ची फायनल सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झाली होती. कोहली आणि क्रिस गेल चांगले खेळले मात्र त्यांना हा सामना आणि स्पर्धा गमवावी लागली होती.
विराटने यावेळी कर्णधार म्हणून विजेतेपद मिळवता न आल्याचे दुःखही त्याने व्यक्त केले आहे. ” एक कॅप्टन म्हणून एकदाही विजेतेपद जिंकता न आल्याचे दुःख मला आहे. आमच्याकडे संधी होती. आम्ही अनेकदा विजयाच्या जवळ पोहचलो होतो. आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे की आम्ही जिंकू शकलो नाही. याचे कारण म्हणजे आम्ही तितके धैर्यवान नव्हतो किंवा आमची योजना तशी नव्हती जशी त्यावेळी असायला हवी होती. तुम्ही असं म्हणू शकतात कि आमच्यावर अपेक्षांचे खूप मोठे ओझे होते जे आम्ही पूर्ण करू शकलो नाही. ”
महत्वाच्या बातम्या
- “तीन महिने उठला नाही पाहिजे असा मारण्याचा कट होता”, किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप
- यापुढे सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड ठेवणार; राज्य शासनाचा निर्णय
- राम कदम यांच्या पत्रावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,‘लतादीदींचे स्मारक बनवणे…’
- धर्म संसदेतील वादग्रस्त वक्तव्यांवर आरएसएस विश्वास ठेवत नाही- मोहन भागवत
- “लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कात स्मारक बांधा”, राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

