Share

“हत्ती कशाला आणता, उदयनराजेंनी नुसती माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडला जाईन”

Published On: 

सातारा : सातारा एमआयडीसीतील पंडीत ऑटोमोटिव्ह ही कंपनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लिलावात विकत घेतली आहे. त्यानंतर या कंपनीतील कामगारांनी नोकरीवरुन काढल्याचा आरोप करत आंदोलन केले होते. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते’ असा इशारा दिला होता. त्याला आता आ. शिवेद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिवेंद्रराजे उदयनराजेंना प्रत्युत्तर देताना म्हणाले, ‘कशाला? तुम्ही हात्ती आणणार, वन विभागाची परवनागी घेणार. त्यापेक्षा उदयनराजेंनी नुसती माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडला जाईन. मी त्यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर राहातो. कारखानदारांकडून हप्ते घेणं त्यांना दमटाटी करणं, यामुळे सुद्धा साताऱ्यातील एमआयडीसीमध्ये कंपन्या आल्या नाहीत. तसेच असलेल्या कंपन्याही निघून गेल्या.’

‘लिलाव सहा वेळा काढला तेंव्हा का यांनी आवाज उठवला नाही. तु्म्ही त्यावेळी का हरकत घेतली नाही. धमक्या देणे ही सातारकरांना सवय झाली आहे. खासदारांनी तेथे येऊन काही केले तर ट्रेसपासचा गुन्हा दाखल करणार आहे. तुम्हाला जायचे तर हायकोर्टात जा, ते निर्णय देतील. आम्ही काय पाकिस्तानमधून आलो नाही. व्यवसाय आहे. सगळेच व्यवसाय करतात. आम्ही कारखानदारांनाच ही जागा दिली. हा निर्णय सातारच्या दृष्टीने चांगलाच आहे,’ असेही शिवेंद्रराजे यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!