Share

IND VS WI: भारताची १०००वा सामना जिंकत विजयी सुरुवात

Published On: 

मुंबई : वेस्ट विंडीज विरुद्ध एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपला १०००वा एकदिवसीय सामना दमदार शैलीत जिंकला. भारतीय संघाने विंडीजला ६ विकेट्सने पराभूत केले. तसेच ३ सामन्याच्या मालिकेत १-० आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकून जिंकत भारतीय संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या ४ विकेट्सच्या जोरावर भारतने विंडीजला १७६ धावांवरच सर्वबाद केले. विंडीजच्या १७६ धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याने १० चौकार आणि १ षटकारासह ६० धावा केल्या. भारतने अवघ्या २८ ओव्हरमध्ये लक्षापर्यंत पोहचत विजय मिळवला आहे.

भारतासाठी १०००वा एकदिवसीय सामना खास ठरला आहे. रोहित शर्माची कर्णधार म्हणून नवीन सुरुवात या विजयाने गोड झाली आहे. मात्र विराट कोहलीच्या ७१ व्या शतकाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. विराटला या सामन्यात केवळ ८ धाव करता आल्या. भारताचा दुसरा सामना ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!