🕒 1 min read
अहमदाबाद : भारत १ वर्षाने मायदेशात एकदिवसीय मालिका खेळात आहे. दिनांक ६ फेब्रुवारी पासून वेस्टइंडीज विरुद्ध भारताची एकदिवसीय मालिका सुरु झाली. अहमदाबाद येथील श्री. नरेंद्र मोदी या मैदानावर भारताची वेस्टइंडीज विरुद्धची ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. ६ फेब्रुवारी रविवार रोजी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्टइंडीजचा ६ गडी राखून पराभव केला आहे. भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर, युझवेन्द्र चहेल याच्या प्रभावी फिरकी माऱ्यासमोर वेस्टइंडीजचा डाव १७६ धावांवर गुंडाळला गेला.
तर भारतातर्फे रोहित शर्मा याने तडाखेबाज फलंदाजी करत ५१ चेंडूत ६० धाव केल्या आणि भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. भारताचा हा १००० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यावर भारताने तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा भारतीय एकदिवसीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यावर भारताचा हा पहिलाच एकदिवसीय सामना होता. गोलंदाजीत युझवेंद्र चहेल आणि फलंदाजीत रोहित शर्मा यांच्या प्रभावी माऱ्यासमोर वेस्टइंडीज संघाचा निभाव लागला नाही.
Not the start to series boys wanted. But we go again on Wednesday. #MenInMaroon #INDvWI pic.twitter.com/1VpPjMHnyZ
— Windies Cricket (@windiescricket) February 6, 2022
वेस्टइंडीजच्या या दारुण पराभवानंतर कर्णधार कायरन पोलार्ड काहीसा नाराज झालेला दिसला. तो म्हणाला कि, ” भारताविरुद्ध आम्ही पूर्ण ५० षटके पण खेळू शकलो नाही ही अत्यंत शरमेची बाब असून आम्ही २२ षटकच फलंदाजी करू शकलो. ही वेस्टइंडीज क्रिकेटसाठी लाजिरवाणी गोष्ट असली तरी आम्ही या पराभवावर नक्कीच मंथन करू आणि आज झलेल्या चुका दुरुस्त करायच्या प्रयत्न करू. वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने पण भारताविरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर ” आम्हाला अश्या सुरवातीची अपेक्षा नव्हती पण आम्ही बुधवारी पुन्हा येथेच येऊन चांगला खेळ करू अशी अपेक्षा” असे ट्विट केले.
महत्वाच्या बातम्या :
- शाहरुख थुंकला नाही तर त्याने दुआ मागून…
- “के एल अजूनही त्या मॅचचे फोटो काढून ठेवतो., ते दुःख संपतच नाही” विराट कोहलीने केला मोठा खुलासा
- “राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत, पोलिसांना कोणी वाली उरला नाही”
- “हत्ती कशाला आणता, उदयनराजेंनी नुसती माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडला जाईन”
- IND VS WI: भारताची १०००वा सामना जिंकत विजयी सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
