Share

Aadesh Bandekar : आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर शरद पोंक्षेंनी दिले सडेतोड उत्तर, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला पाठिंबा दिला तर काहींनी त्याला विरोध केला. यासगळ्यात अभिनेते शरद पोंक्षेंनी एकनाथ शिंदे यांना एक पोस्ट शेअर करत पाठिंबा दिला होता. तर यावर आता आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षेंचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांना प्रश्न केला होता. आता यावर शरद पोंक्षेंने सडेतोड उत्तर दिले आहे.

शरद पोंक्षेंनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.. या पोस्टमध्ये शरद पोंक्षेंनी त्यांच्या पुस्तकातील पानाचा एक फोटो शेअर केला यावेळी आदेश बांदेकर यांची स्तूती करताना शरद म्हणाले, “असा हा आदेश, सहृदयी माणूस!” ही पोस्ट शेअर करत “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही” असे कॅप्शन देत त्यांनी आदेश बांदेकर यांना टॅग केले. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

काय म्हणाले होते आदेश बांदेकर?

आदेश बांदेकरांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून शरद पोंक्षेंनी दिलेल्या व्हिडीओ शेअर केला. व्हिडिओमध्ये शरद पोंक्षें म्हणाले, “सगळ्यात पहिले धावून आला तो आदेश बांदेकर. आदेश म्हणाला कसली काळजी करू नकोस, मी आदेशला फोन केला आणि सांगितले की अशी-अशी शक्यता आहे असे ते सांगत आहेत. तर काय करू मला आता कळत नाही आहे. आदेश बांदेकर म्हणाले, काळजी करू नकोस, मी उद्याच्या उद्या तुला नांदेकडे पाठवतो. हिंदू कॉलनीतील नांदे हे खूप मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे पाठवले आणि मग ती सगळी प्रोसेस सुरु झाली. तर अशा प्रकारे पहिला आदेश उभा राहिला. आदेशमुळे उद्धव ठाकरेंना कळलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, शरद कसली काळजी करू नकोस शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पैशापासून कसली काळजी करायची नाही.” हा व्हिडीओ शेअर करत हा शरद पोंक्षे तुच ना?” असा प्रश्न आदेश बांदेकर यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!