Share

Sandeep Deshpande : “लोकप्रभा मध्ये कारकून असणाऱ्यांना राजसाहेबांनी…”, ‘मनसे’चा संजय राऊतांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेशी बंड करणाऱ्या आमदारांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलेच सुनावले आहे. सेनेशी बंड करणरे मूळ सेनेचे नाहीच असे म्हणत त्यांनी प्रत्येक आमदाराचा इतिहासच समोर ठेवला. यावरूनच मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही संजय राऊतांची राजकीय कुंडलीचा दाखला देत टोला लगावला.

“दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरी वाला ,भाजी विकणारा ,वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभा मध्ये कारकून होते तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामना चे संपादक बनवलं.”, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दरम्य कालच्या सामना अग्रलेखात संजय राऊत यांनी म्हटले होते कि, संदीपान भुमरे यांना मोरेश्वर सावे यांची उमेदवारी कापून तेव्हा पैठणची उमेदवारी दिली. शिवसैनिकांच्या मेहनतीने ते सतत विजयी झाले. आज ठाकरे सरकारात ते कॅबिनेट मंत्री झाले. पैठणच्या एका साखर कारखान्याच्या दारात वॉचमनची नोकरी करणारा हा माणूस शिवसेनेमुळे 30 वर्षे सत्तेत आहे व वेळ येताच पळून गेला. दादा भुसेपासून अनेक आमदार जे फक्त शिवसेनेमुळे आमदार व मंत्री झाले, ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा भाजपचा जाच होता व आज महाविकास आघाडीत आहेत तेव्हा त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्रास होतोय. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!