Share

Aadesh Bandekar : जुना व्हिडीओ शेअर करत आदेश बांदेकर म्हणाले, हा शरद पोंक्षे तूच ना?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला पाठिंबा दिला तर काहींनी त्याला विरोध केला. यासगळ्यात अभिनेते शरद पोंक्षेंनी एकनाथ शिंदे यांना एक पोस्ट शेअर करत पाठिंबा दिला होता. तर यावर आता आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षेंचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांना प्रश्न केला आहे.

आदेश बांदेकरांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून शरद पोंक्षेंनी दिलेल्या व्हिडीओ शेअर केला. व्हिडिओमध्ये शरद पोंक्षें म्हणाले, “सगळ्यात पहिले धावून आला तो आदेश बांदेकर. आदेश म्हणाला कसली काळजी करू नकोस, मी आदेशला फोन केला आणि सांगितले की अशी-अशी शक्यता आहे असे ते सांगत आहेत. तर काय करू मला आता कळत नाही आहे. आदेश बांदेकर म्हणाले, काळजी करू नकोस, मी उद्याच्या उद्या तुला नांदेकडे पाठवतो. हिंदू कॉलनीतील नांदे हे खूप मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे पाठवले आणि मग ती सगळी प्रोसेस सुरु झाली. तर अशा प्रकारे पहिला आदेश उभा राहिला. आदेशमुळे उद्धव ठाकरेंना कळलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, शरद कसली काळजी करू नकोस शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पैशापासून कसली काळजी करायची नाही.” हा व्हिडीओ शेअर करत हा शरद पोंक्षे तुच ना?” असा प्रश्न आदेश बांदेकर यांनी केला आहे.

https://www.instagram.com/p/CfTmut9D–y/

काय म्हणाले होते शरद पोंक्षे?

पोंक्षेंनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले की, “कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय, दुसरं वादळ एका लढवय्या अभिनेत्याने कॅन्सरवर केलेली मात! एका झुंजीची गाथा! – शरद पोंक्षे, दोन महिन्यात दुसरी आवृत्ती!

त्याचबरोबर या पोस्टमध्ये शरद पोंक्षे यांच ‘दुसरं वादळ’ हे पुस्तक दिसतं आहे. शरद पोंक्षें यांच्यासोबत एकनाथ शिंदे दिसत आहेत. या पोस्टमध्ये “हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत: ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं…सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले,” असे लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!