नवी दिल्ली : अद्याप देशावरच कोरोना संकट टळले नाही तोच आता काही राज्यांमध्ये आणखी एका साथीने धडक दिलीआहे. हे संकट आहे ‘बर्ड फ्लू’चं. या पार्श्वभूमीवर या राज्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
‘बर्ड फ्लू’चं हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळ या राज्यांवर हे नवीन संकट ओढावलं तर सुदैवाने महाराष्ट्रात अद्यापही या साथीचा शिरकाव झालेला नाही. त्यामुळे अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली असून बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केरळने बर्फ फ्लूची प्रकरणं समोर आल्यानंतर या आपत्तीला राज्यास्तरीय आपत्तीचा दर्जा देत असल्याची औपचारिक घोषणा केलीय. मध्य प्रदेशमधील मंदसौर आणि कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये कोंबड्यांचे मांस आणि अंड्यांची दुकान सध्या बंद ठेवण्यात आली आहेत.
आज केरळमधील कोट्टायम आणि अल्लपुझा या दोन जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा राज्य सरकाने जारी केला आहे. हिमाचलमधील स्थलांतरित पक्षांचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तिथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून भाजपचे दयाशंकर तिवारी नागपूरचे नवे महापौर!
- तोडगा काढण्याच्या दिशेने दोन्ही बाजूनी पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता – कृषी मंत्री
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा
- कोरोनाचा कहर : ‘या’ देशात करण्यात आली संपूर्ण लॉकडाउनची घोषणा
- टीम इंडिया सोबत डिनर : ऑस्ट्रेलियात चाहत्यांना कोट्यवधींचा गंडा


