Share

टीम इंडिया सोबत डिनर : ऑस्ट्रेलियात चाहत्यांना कोट्यवधींचा गंडा

Published On: 

ऑस्ट्रेलिया : मेलबर्नमध्ये टीम इंडियानं टेस्ट जिंकल्यानंतर पाच खेळाडूंनी हॉटेलमध्ये जेवल्याचा मुद्दा सर्वप्रथम चर्चेत आला. भारतीय टीम  ब्रिस्बेनमध्ये चौथी टेस्ट खेळण्यासाठी जाणार नाही, अशा देखील बातम्या आहेत. आता हे सर्व कमी म्हणून टीम इंडियाच्या नावावर फॅन्सची फसवणूक केल्याचं प्रकरण उघड झालं.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट ज्या शहरामध्ये होणार आहे, त्या सिडनीमधील हे प्रकरण आहे. सिडनीमधील एका भामट्यानं सिडनीमधील एका मोठ्या रेस्टॉरंटच्या नावानं जाहिरात दिली. ‘टीम इंडियासोबत डिनर करा’ अशी ही जाहिरात होती. ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जवळपास 200 जणांनी ही तिकीटं खरेदी केली. एका तिकीटाची किंमत 40 हजार रुपये आहे.

ऑस्ट्रेलियातील ‘डेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार एका भामट्यानं ‘5 जानेवारी रोजी टीम इंडियाला भेटण्याची आणि डिनर करण्याची संधी’ अशी जाहिरात छापली होती. या जाहिरातीमध्ये त्यानं सिडनीतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटचं नाव वापरलं होतं. त्यानंतर तो आरोपी पैसे घेऊन फरार झाला. आता त्याला पैसे दिलेलं लोकं आपल्या रेस्टॉररंटमध्ये येऊन गोंधळ घालतील अशी भीती त्याच्या मालकाला सतावत आहे. त्यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!