ब्रिटन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशात नव्यानं टाळेबंदी जाहीर केली आहे. कोरोना विषाणूच्या रचना बदललेल्या नव्या आणि अधिक संसर्गजन्य असलेल्या प्रकाराला रोखण्यासाठी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असं आवाहन जॉन्सन यांनी केलं आहे.
करोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाउन लागू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं असून याची सुरुवात शाळांपासून होणार आहे. बुधवारपासून सर्व शाळा बंद होतील अशी माहिती त्यांनी जनतेला संबोधित करताना दिली. स्कॉटलंडकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर बेरिस जॉन्सन यांनी ही घोषणा केली. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
ब्रिटनमध्ये कालपासूनच ऑक्सफर्ड कंपनीच्या लशीचा वापर करून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये सर्वप्रथम आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार आता इतर अनेक देशांमध्येही आढळत असून त्याचा प्रसार वेगानं होत असल्यानं त्याला रोखण्यासाठी कृती करणं आवश्यक असल्याचं जॉन्सन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शंकरराव गडाखांच्या प्रयत्नातून शनिशिंगणापूर ग्रामपंचायत 15 वर्षांनंतर बिनविरोध!
- नामांतर : तेव्हा तुमचे मुख्यमंत्री काय झोपा काढत होते का ? देसाई भाजपवर कडाडले
- चिमुकल्या झिवाच बाबा धोनी सोबत जाहिरात क्षेत्रात पदार्पण
- प्रदेशाध्यक्षपदासाठी आता तरुणांना संधी द्यावी,आम्ही त्यांच्या मागे उभे राहू : बाळासाहेब थोरात
- टीम इंडिया सोबत डिनर : ऑस्ट्रेलियात चाहत्यांना कोट्यवधींचा गंडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
