Share

तोडगा काढण्याच्या दिशेने दोन्ही बाजूनी पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता – कृषी मंत्री

Published On: 

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि 41 शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी यांच्यात काल नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे चर्चेची सातवी फेरी झाली. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर,रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री सोम प्रकाश या चर्चेत सहभागी झाले. आंदोलना दरम्यान दिवंगत झालेल्यांप्रती दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.

याआधी झालेल्या बैठकांमधली चर्चा लक्षात घेत, शेतकऱ्यांच्या मुद्याबाबत खुल्या मनाने तोडगा काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे तोमर यांनी सांगितले. तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत कृषी कायद्याबाबत विविध राज्यातल्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. वादग्रस्त मुद्यांच्या निराकरणासाठी, कृषी कायद्याबाबत कलम निहाय चर्चा सुरु ठेवता येईल असे ते म्हणाले.बैठकीत दोन्ही बाजूनी आपापली मते मांडली. 8 जानेवारी 2021 ला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!