🕒 1 min read
नागपूर:- माजी महापौर संदीप जोशींनी यापुढे कोणतीही महापालिका निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अनिल सोले यांचं तिकीट कापून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. परंतु जोशींना भाजपचा बालेकिल्ला राखता आला नाही. संदीप जोशी यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी मोठ्या फरकाने विजयी झाले.
त्यानंतर जोशींनी आपल्या महापौर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचेच दयाशंकर तिवारी यांची महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसच्या रमेश पुणेकर यांचा पराभव केलाय. तिवारी हे नागपूरचे 54वे महापौर ठरले आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या मनोज गावंडे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे तिवारी विरुद्ध पुणेकर अशी निवडणूक पाहायला मिळाली.
तिवारी यांना 151 पैकी एकूण 107 मतं मिळाली आहेत. काँग्रेसचे रमेश पुणेकर यांना 27 मतांवर समाधान मानावं लागलं. तर बसपाचे उमेदवार नरेंद्र वालदे यांना 10 मतं मिळाली आहेत. या निवडणूक प्रक्रियेत 5 सदस्य अनुपस्थित होते. त्यात तांत्रिक बिघाडामुळे लिंक न मिळाल्याने काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे, गार्गी चोप्रा, बंटी शेळके, शिवसेनेचे किशोर कुमेरिया आणि अपक्ष नगरसेवक आभा देशपांडे हे मतदानापासून वंचित राहिले.
महत्वाच्या बातम्या
- लोकसभा अध्यक्षांची कन्या पहिल्याच प्रयत्नात झाली ‘आयएएस’ अधिकारी !
- कोरोनाचा कहर : ‘या’ देशात करण्यात आली संपूर्ण लॉकडाउनची घोषणा
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने एकदा नाही तर दोनदा नामांतराचा प्रस्ताव फेटाळला’
- राष्ट्रवादीचा भाजपला जबर धक्का; नवी मुंबईतील मातब्बर नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
- नियमाचे उल्लंघन केल्याने रोहितसह पाच खेळाडूंची माजी क्रिकेटरने ट्विटरवर घेतली शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
