Share

संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : गेल्या वर्षभरात भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. २०१४ नंतर भाजपमध्ये झालेली मेगाभरती थांबली आहे. तर, भाजपमधून गळती सुरु झाल्याचं दिसून येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थक नेत्यांनी देखील भाजपला रामराम ठोकला होता.

यानंतरही, भाजपला छोटे-मोठे धक्के सहन करावे लागले. महाविकास आघाडीतील एकीममुळे भाजपला पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकांमध्ये देखील जिव्हारी लागणार पराभव स्वीकारावा लागला होता. आता, शिवसेना भाजपला आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

शिवसेनेचे खासदार व नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँकेतील घोटाळ्याच्या संबंधित चौकशीसाठी ईडीची नोटीस आली आहे. ईडी या प्रकरणी चौकशी करत असून भाजपने संजय राऊत यांच्यासह शिवसेनेला चांगलंच लक्ष्य केलं आहे. आता, संजय राऊत या टीकेचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत.

संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये गुरुवारी भाजपचे दोन मोठे नेते सेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील महिन्याच्या अखेरीस शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या या प्रवेशाला भाजपमधील नेत्यांचा अंतर्गत विरोध होता. त्यामुळे या नाराज नेत्यांपैकी दोन नेत्यांना शिवसेनेत घेऊन राऊत हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या सानप यांची कमी भरून काढतानाच भाजपला जोरदार धक्का देखील देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राऊत नाशिक दौऱ्यात एका दगडात दोन निशाणे लावणार का? याकडे आता राजकीय क्षेत्राचे लक्ष्य लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!