मुंबई : ‘काश्मीर फाईल्स’नं सोशल मीडियावर वेगळीच वातावरण निर्मिती केली आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावरील कौतूकाचा वर्षाव काही केल्या थांबायला तयार नाही. त्यांना आता थेट ब्रिटिश संसदेतून काश्मीर फाईल्सच्या स्क्रिनिंगसाठीचं निमंत्रण मिळालं आहे. त्यामुळे सातासमुद्रापार काश्मीर फाईल्सची प्रसिद्धी झाल्याचे दिसून आले आहे.ब्रिटिश संसदेनं विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांना काश्मीरी पंडितांविषयी चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
एका मुलाखतीच्या दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आम्हाला आता ब्रिटिश संसदेनं निमंत्रित केलं आहे. एप्रिलमध्ये आम्ही त्याठिकाणी जाणार आहोत. काश्मीरी पंडितांवर जे अन्याय, अत्याचार झाले आहेत ते लोकांना कळावे यासाठी आम्ही हा चित्रपट तयार केला आहे. आता आम्हाला एका गोष्टीचा आनंद होतो आहे की, आम्ही जो उद्देश ठेवला होता. त्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
काश्मीर फाईल्समध्ये पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
महत्वाच्या बातम्या :


