Share

IPL 2022 : हैदराबादची पराभवानंतरही होतेय चर्चा ; कारण ‘ती’ परतलीये !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सनरायझर्स हैदराबादने मंगळवारी आयपीएल २०२२ चा पहिला सामना खेळला. या सामन्यात हैदराबादच्या पराभवामुळे चाहते निराश झाले असतील, पण संघाची मालक काव्या मारनला पाहून त्यांचा राग नक्कीच थंडावला आहे. काव्या आपल्या टीमला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. त्या सामन्यादरम्यान रोमॅरियो शेफर्डने सातव्या षटकात राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला बाद केले तेव्हा काव्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

रोमॅरियो शेफर्डने (romario shephard) विकेट घेतल्यानंतर काव्या मारन (kavya maran) तिच्या खुर्चीवरून उठली आणि हसत टाळ्या वाजवायला लागली. तिच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. संघाच्या पराभवापेक्षाही संघाची मालकीण हेडलाईन्स जमवताना दिसत आहे. याआधीही तिने अशाच प्रकारे चाहत्यांची मने लुटली आहेत. काव्या आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये देखील आली होती, त्यानंतर ती हैदराबादच्या (SRH) प्रत्येक सामन्यात चर्चेचा विषय बनते.

सामन्याच्या शेवटी मात्र ती निराश झालेली दिसली. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील सामन्यात राजस्थान रॉयल्सने हैदराबादचा अत्यंत वाईट पद्धतीने पराभव केला. राजस्थानने हैदराबादचा ६१ धावांनी पराभव केला. या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांना चांगलाच फटका बसला आहे. त्याचवेळी राजस्थानच्या गोलंदाजांनीही हैदराबादच्या फलंदाजांची तारांबळ उडवली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!